Friday, 9 October 2020

अबोला

मनातला कलकलाट मनात ठेवून
अबोला धरल्यासारखी ती वागत होती
रात्रही मग आता सरून गेली
ज्याच्या आठवणीत ती अशी झुरत होती

© प्रेमळ मन

उरलेले शब्द

उरल्या सूरल्या शब्दांची आता
मला एक चारोळी रचायची आहे
अन तुझ्यावर असलेलं प्रेम आता
त्या शब्दात व्यक्त करायचे आहे 

© प्रेमळ मन

गुलाबी थंडी

गुलाबी थंडीच्या हुडहुडीने आजकाल सूर्य ही उशिरा उगवतो अन मिठीत तुझ्या राहून मग तो ही रात्रभर जागवतो 

© प्रेमळ मन

Wednesday, 7 October 2020

आठवणी

सुंदर तुझ्या आठवणी मनात जपायचा
 मी खूप प्रयत्न करत होतो
सुंदर आयुष्य जगायचं सोडून
उगाच तुझ्या आठवणीत मरत होतो

© प्रेमळ मन

अबोला

मनातला कलकलाट मनात ठेवून अबोला धरल्यासारखी ती वागत होती रात्रही मग आता सरून गेली ज्याच्या आठवणीत ती अशी झुरत होती © प्रेमळ मन