मनातला कलकलाट मनात ठेवून
अबोला धरल्यासारखी ती वागत होती
रात्रही मग आता सरून गेली
ज्याच्या आठवणीत ती अशी झुरत होती
© प्रेमळ मन
Friday, 9 October 2020
अबोला
उरलेले शब्द
उरल्या सूरल्या शब्दांची आता
मला एक चारोळी रचायची आहे
अन तुझ्यावर असलेलं प्रेम आता
त्या शब्दात व्यक्त करायचे आहे
© प्रेमळ मन
गुलाबी थंडी
गुलाबी थंडीच्या हुडहुडीने
आजकाल सूर्य ही उशिरा उगवतो
अन मिठीत तुझ्या राहून मग
तो ही रात्रभर जागवतो
© प्रेमळ मन
Wednesday, 7 October 2020
आठवणी
सुंदर तुझ्या आठवणी मनात जपायचा
मी खूप प्रयत्न करत होतो
सुंदर आयुष्य जगायचं सोडून
उगाच तुझ्या आठवणीत मरत होतो
© प्रेमळ मन
Subscribe to:
Comments (Atom)
अबोला
मनातला कलकलाट मनात ठेवून अबोला धरल्यासारखी ती वागत होती रात्रही मग आता सरून गेली ज्याच्या आठवणीत ती अशी झुरत होती © प्रेमळ मन